सोलापूर प्रतिनिधी- सोलापूर जिल्ह्यातील अति महत्वाचे मानले जाणारे शहर म्हणजे टेम्भुर्णी आहे. टेम्भुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सर्व परिसरात,गावोगाव, MIDC भागात, पुणे-सोलापूर हायवेवरती मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या कृपाशीर्वादाने जोमात सुरू आहेत आशा गंभीर आरोप मा.सुनील ओहोळ (राष्ट्रीय अध्यक्ष- बहुजन सत्यशोधक संघ-नई दिल्ली) यांनी केला आहे. तसेच बहुजन सत्यशोधक संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सह्याचे निवेदन पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक-कोल्हापूर, पोलीस अधीक्षक व संबंधित वरिष्ठ अधिकारी व सरकारला दिले आहे.
The Bahujan Satyashodak Sangh warned that action should be taken against Police Inspector Suresh Nimbalkar ofTembhurni Police Station.
1 नोव्हेंबर 22 पर्यंत अवैध धंदे बंद करून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यावरती कारवाई न केल्यास बहुजन सत्यशोधक संघ व इतर 5 बहुजनवादी, रिपब्लिकनवादी संघटनांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी समोर बेमुदत आंदोलन करणार असा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे.
तसेच पोलीस निरीक्षक सुरेश धर्मवादी असल्याचे व धार्मिक कामकाज पोलीस स्टेशन मध्ये करून संविधानाचा अवमान करत असल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्राने व सोशल मीडियाने मागे लावल्या होत्या त्याचा देखील पाठपुरावा करून लवकरच सर्व पुराव्यासह उच्च न्यायालयात विविध संघटनांच्या वतीने केस दाखल करणार असल्याचे सुनील ओहोळ यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment