चंद्रपुर :दिवाळीचा पहिला दिवा हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून अर्पण करण्यात आला. इतिहास साक्ष आहे,स्वराज्य उभारुन रयतेच्या मनातील गुलामी अंधकार दूर करून प्रकाशमय स्वातंत्र उभे करणारे एकमेव वंदनीय श्रीमंतयोगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरण करून चंद्रपुर येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग थिंकर्स चंद्रपुर व मित्र परिवार तर्फे दिवाळीची सुरुवात दिप-उत्सव करून करण्यात आली.Deep-Utsav program celebrated enthusiastically by Young Thinkers Chandrapur
या सोबतच महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण व नमन करण्यात आले.यावेळी यंग थिंकर्स चंद्रपुर चे सदस्य शुभम निंबाळकर,निशिकांत आष्टनकर, आकाश वानखेड़े, साहिल आष्टनकर,निखिल दोहारकर,रुपेश चहारे,पवन चौधरी,गुंजनकुमार हाडगे, मानसी गेड़ाम,श्रावणी चौधरी, श्रावनी बाटवे उपस्थित होते. या सोबतच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा.शितल चव्हाण,रोशनी नगपुरे,शंकर वांढरे यांनीही सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

0 comments:
Post a Comment