उर्जानगर:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ललित कला भवन चंद्रपूर येथे २०२२ ची वर्धा चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्ह्याची गटस्तरिय पुरुष व महिला भजन स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये दहा महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला होता तर आठ पुरुष भजन मंडळाने सहभाग घेतला.या स्पर्धेत चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या वसाहतीतील कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर तर्फे श्रीगुरुदेव सेवा महिला व पुरुष भजन मंडळाने सहभाग घेतला.या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगरने महिला भजन मंडळाला स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.सोबतच उत्कृठ तालसंचालन प्रथम क्रमांक पटकावला.
उत्कृष्ठ गायिकेचा प्रथम क्रमांक सौ शोभना शेख यांनी मिळाला तसेच कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर तर्फे पुरुष भजन मंडळाने सहभाग घेतला होता.या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगरने पुरुष भजन मंडळाला स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळाले सोबतच ताल संचालनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आणि उत्कृष्ठ हार्मोनियम वादकचा प्रथम क्रमांक राजेंद्र पोईनकर यांना मिळाला.
यावेळी महिला संघामध्ये गायिका शोभना शेख,मालू कोंडेकर,सुषमा उगे,ज्योत्स्ना लांडे,मुक्ता पोईनकर, ज्योत्स्ना बावणे,रुपाली चहानकर, चंदा बावणे,शितल मेश्राम,मनिषा दुर्गे,योगिता कुलमेथे,सविता हेडावू, माधुरी दुफारे यांनी सहभाग घेतला.
तसेच पुरुष संघामध्ये राजेंद्र पोईनकर,प्रशांत दुर्गे,सदाशिव आघाव, विलास उगे,देवराव कोंडेकर,राजेंद्र लांडे,शंकर दरेकर,मारोती पिदूरकर,गणेश लहाने,बंडू कुळमेथे,हेमंत झाडे,नानाजी बावणे,अशोक खाडे,संतोष चहानकर यांनी सहभाग घेतला.या दोन्हीही भजन गटांचे परीक्षण मा. रविकांत राठोड, मा.किसन पोडे व कु.स्वाती नक्षिने यांनी केले तर या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मा.दत्ता हजारे जिल्हा सेवाधिकारी श्री गुरूदेव सेवा मंडळ चंद्रपूर,मधुसूदन रुंगठा अध्यक्ष एम आय डी सी चंद्रपूर,नंदनवारजी ग्रामगीताचार्य,अजय जाधव व अनुराधा हजारे,सीमा पिंपळशेंडे,नंदा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीगुरुदेव सेवा भजन मंडळाने मिळविल्या यशाबद्दल कामगार कल्याण मंडळाचे कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे सर तसेच ऊर्जानगरच्या श्रीगुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी व सदस्य, कामगार कल्याण केंद्राच्या प्रभारी संचालिका मोहना खोब्रागडे मॅडम तथा उर्जानगर वासीयांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment