Ads

बॉटनिकल गार्डनचे काम सर्वांच्या समन्वयातून वेळेत पूर्ण करा

चंद्रपूर : चंद्रपूर-बल्लाेरपूर मार्गावर विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी जैव विविधता उद्यान (बॉटनिकल गार्डन) हे चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव राहणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्याा जयंतीदिनी म्हलणजे 25 डिसेंबरला या उद्यानाचे लोकार्पण करायचे आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयातून उत्तोमत्तोम काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृेतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
Complete the work of the botanical garden in time with the coordination of all
बॉटनिकल गार्डन येथे कामकाजाच्या प्रगतीचा ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्या वनसंरक्षक आणि वनबल प्रमुख डॉ. वाय.एल.पी राव, वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मध्यचांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार आदी उपस्थित होते.
देशातील अत्याबधुनिक बॉटनिकल गार्डन चंद्रपूर येथे साकार होत असल्याेने वनसंपदा व वनेत्तर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्यािसाठी या गार्डनला देश-विदेशातील पर्यटक भेट देतील, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कोणतेही काम जबरदस्तीने करू नका. एकमेकांच्या समन्वयातून काम वेळेत होणे गरजेचे आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलू नका. बॉटनिकल गार्डनेचे काम एकदम उत्तम झाले पाहिजे. काम करणारे व्यक्तीसुध्दा उत्कृष्टच असायला हवीत.
वन विभागाने येथील कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. तसेच कोणत्या यंत्रणेकडून कामात चालढकल होत आहे, त्याबाबत आपल्याला अवगत करावे. येथील प्रत्येक गोष्ट मजबुत आणि दिसायला आकर्षक असली पाहिजे. साईनेजेस नाविन्यपूर्ण करा. तसेच रेस्टॉरंटसह चांगल्या दर्जाचे आईस्क्रीम / कुल्फी, नारळाचे पाणी, ज्युस, कोल्ड्रींक्स आदींचे सुध्दा स्टॉल लावण्याचे नियोजन करा. पार्किंग व्यवस्था अतिशय चांगली असली पाहिजे. नाविन्यपूर्ण लेझर शो, 15 – 20 सेल्फी पॉईंट्स आदींचे नियोजन करा. बॉटनिकल गार्डनमध्ये ज्या गोष्टी शोभा वाढविण्यासाठी आहेत, त्या सर्व गोष्टींची पुर्तता करून घ्यावी. निधीची कमतरता पडणार नाही. बॉटनिकल गार्डन, कन्झवर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्यात तीन विभागामध्यें हे उद्यान तयार होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्लॅनेटोरीयम, सोलर एनर्जी पार्क, अंडरग्राऊंड म्युझियम, बटरफ्लाय गार्डन, सायन्स सेंटर, कॅफेटेरीया, प्रशासन इमारत, प्रदर्शन बिल्डींग, इंटरन्स प्लाझा, फिश ॲक्वेरीयम, सायन्स पार्क, रेस्टॉरंट आदी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तत्पुर्वी पालकमंत्यां च्या हस्ते परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. बैठकीला संबंधित यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment