Ads

भद्रावती येथे रोटरी दिवाळी मेळ्याचे शानदार उद्घाटन.

भद्रावती :-भद्रावती शहरातील तालुका क्रिडा संकुलनात रोटरी क्लब भद्रावतीच्या Rotary Club of Bhadravati वतिने आयोजित करण्यात आलेल्या रोटरी दिवाळी मेळ्याचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.मेळ्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मेळ्याला उदंड प्रतिसाद देत या मेळ्यात गर्दी केली.
Grand opening of Rotary Diwali Mela at Bhadravati.
मेळ्याचे उद्घाटन आयुध निर्माणीचे महाप्रबंधक बिजायकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करुन करण्यात आले.यावेळी रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर माया मिहाणी,ठाणेदार गोपाल भारती,रोटरी अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद,सचिव तथा नगराध्यक्ष अनील धानोरकर,कोषाध्यक्ष सुधीर पारधी,अब्बास अजाणी यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या दिवाळी मेळ्याच्या माध्यमातून प्राप्त होणारी रक्कम ही रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यात येईल अशी माहिती यावेळी प्रास्ताविकातून देण्यात आली. सदर दिवाळी मेळा हा ३०आक्टोबर पर्यंत चालणार असुन तंबोला व फटाका शो या दिवाळी मेळ्याचे खास आकर्षण आहे. याशिवाय या मेळ्यात १२०विवीध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असुन तिस स्टॉल हे विवीध प्रकारच्या वेज तथा नान व्हेज खाद्यपदार्थांचे आहेत.याशिवाय मेळ्यात फॅशन शो, एकल नृत्य, समुह नृत्य अशी विवीध प्रकारचे कार्यक्रम आहेत.पहिल्याच दिवशी नागरिकांनी या दिवाळी मेळ्याला मोठा प्रतिसाद देत गर्दी केली. यावेळी नागरिकांनी मेळ्यातील विवीध प्रकारच्या झुल्यांचा आस्वाद घेतला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment