Ads

अहिल्यादेवी नगरात आरोग्य निदान शिबीर : दोनशे लाभार्थ्यांनी घेतला लाभ

भद्रावती तालुका प्रतिनिधी
शहरातील कन्नमवार वार्डातील अहिल्यादेवी नगर येथील जयदुर्गा देवी उत्सव मंडळाच्या वतीने दि.१
ऑक्टोबरला सकाळी १० ते ५ वाजेपवेतो निःशुल्क आरोग्य निदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात २०० हून अधिक विविध आजाराच्या रुग्णांनी लाभ घेतला.Health diagnosis camp in Ahilyadevi town: Two hundred beneficiaries benefited
सर्वप्रथम मां दुर्गेच्या प्रतिमेला नगरपालिकेचे उपाध्यक्ष संतोष आमने यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्गा उत्सव मंडळाच्या माधुरी गेडाम ह्या होत्या तर डॉ. दिपीका सिंह,गुरुदेव मेडिकलचे संचालक प्रमोद कामडी प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरामध्ये स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय चमूचे विशेष योगदान राहिले.या शिबिराचे प्रास्ताविक वैभव दारव्हनकर , संचालन शुभम पचारे तर आभार प्रदर्शन मंगेश बुरडकर यांनी केले.या शिबिराचे यशस्वितेसाठी माया पचारे, कुंदा दारव्हनकर,ललित बैद,मंदा कामडी,अनिता बुरडकर,मीना शेंडे, प्रियंका बैद,संगीता,गीता सक्सेना,रेणुका बगडे,स्नेहा बुरडकर,मोनिका कामडी,प्रियंका नादनुरवार,पायल नादनुरवार,रोशन आकुलवर आदींनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment