Ads

नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उत्खनन करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले - एक लाख 18 हजार रुपये दंड

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील उमा नदीच्या पात्रातून अवैध प्रकारे रेती उत्खनन करून रात्रौ रेतीचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर सिंदेवाही कार्यालय येथे जप्त करण्यात आले आहे.
A tractor transporting sand illegally mined and transported from the riverbed at Virva was caught - 1 lakh 18 thousand rupees fine
सविस्तर वृत्त असे की, विरव्हा उमा नदी पात्रातून रेती भरून ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम एच 34 बी आर 682 8 , असा असून हा ट्रॅक्टर सिंदेवाही महसूल विभागाचे तलाठी मुरकुटे व अहीरकर यांना रात्रौ बारा वाजताच्या दरम्यान अवैध प्रकारे रेती वाहतूक करत आहे अशा गोपनीय माहिती मिळाली त्या माहिती आधारे विरव्हा येथे गेले. त्यांना सदर वाहन दिसून आले त्यांनी ते ट्रॅक्टर वाहन थांबविले असता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती भरलेले दिसले लगेचच त्यांनी ते सदर वाहन ट्रॅक्टर ट्रॉली आपल्या ताब्यात घेऊन सिंदेवाही तहसील कार्यालयात सदर वाहन जप्त केले व तहसीलदार यांना सांगितले.
10 नोव्हेंबर ला सदर ट्रॅक्टर मालकावर अवैध प्रकारे गौण खनिज उत्खनन केल्यामुळे एक लाख 18 हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला असून असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर यांना पाठवण्यात आला आहे.सदर वाहन हे पेटगाव येथील व्यक्तीची आहे अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment