Ads

स्वतंत्र विदर्भासाठी प्रयत्न करणार-खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन निवासस्थानासमोर आलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे खासदार बाळू धानोरकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
Will try for independent Vidarbha-MP BaluDhanorkar
स्वतंत्र विदर्भ राज्य हे वैदर्भीय लोकांचे हक्क आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आपला पाठिंबा आहे. त्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

ज्येष्ठ विदर्भवादी नेते ऍड. वामनराव चटप, विधिमंडळाचे माजी उपसभापती मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या नेतृत्वात विदर्भवादी आंदोलकांनी खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली. पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे .त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी भाजप विरोधात आंदोलन करण्याची आज गरज आहे. विदर्भ राज्य मिळवून घेण्यासाठी लढा पुन्हा अधिक तीव्र करण्यासाठी आपला पाठिंबा कायम असेल. विदर्भातील एक खासदार म्हणून आपण नेहमी विदर्भ राज्याच्या बाजूने असू, असेही ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल रजा, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, काँग्रेस युवा नेते राज यादव, पप्पू सिद्धीकी यांची उपस्थिती होती.

ऑक्टोबर 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीने वेगळा विदर्भ करू, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुका लढल्या आणि राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असताना देखील स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा केलेली नाही. भारतीय जनता पार्टीने मतदारांचा हा घोर अपमान केलेला आहे, असे देखील खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment