Ads

बल्लारपूर येथील मुर्ती विटंबना प्रकरणातील आरोपीतास पोलीसांनी २४ तासांत घेतले ताब्यात.

चंद्रपुर :दिनाक 23/11/2022 चे रात्रीच्या वेळी बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्यीतील बल्लारपुर ते चंद्रपूर रोडवरील भिवकुंड गावाच्या लगत रोडच्या बाजुला असलेल्या हनुमान मंदीरातील मुर्तीची कोणीतरी अज्ञात इसमाने तोडफोड करून अव्हेलना केल्याची घटना घडली.Ballarpur police station सदर घटनेबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशन अप.क्र. 1128 / 2022 कलम 295 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
The accused in the Ballarpur idol vandalism case were taken into custody by the police within 24 hours.
सदर घटना संबंधाने दिनांक 24/11/2022 चे सकाळी माहीती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बाळासाहेब खाडे पोलीस निरीक्षक पोस्टे बल्लारपूर उमेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीत इसमाचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केले.

मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील सपोनि विकास गायकवाड यांचे सोबतच्या डिबी पथकातील अंमलदारांचे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदिप कापडे, सपोनि मंगेश भोयर यांचे सोबत स्थागुशा येथील अंमलदारांचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपीची शोध मोहीम चालु केली.

सदर गुन्हा करण्याच्या पध्दतीचे अवलोकन केले असता सदर मुर्तीची तोडफोड ही कोणीतरी मनोरूग्न व्यक्तीने केली असावी असे सकृतदर्शनी दिसुन येत असल्याने त्या दृष्टीने शोध मोहीम चालु केली. सदर घटनास्थळावरून चारही दिशेला जाणारे वेगवेगळया रोडवरील रेल्वेस्थानके, बस स्थानक, धाबे व वर्दळीच्या ठिकाणी शोध मोहीम चालु केली. दिनांक 24/11/2022 रोजी सदर शोध मोहीमे दरम्यान पोस्टे बल्लारपूर चे सपोनि गायकवाड व त्यांच्या पथकाला गोंडपिपरी रोड वर बल्लारपूर पासुन 35 ते 40 कि.मी. चे अंतरावर रात्रीच्या वेळी रोडने एक संशयीत इसम जाताना दिसुन आला. सदर पथकाने त्यास ताब्यात घेतले त्या वेळी त्याचे हाताला व कपडयांना मुर्तीला असलेले तेल मिश्रीत शेंदुर लागल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर इसमानेच तोडफोड केल्याची खात्री पटली त्याचेकडे चौकशी केली असता त्याने मुर्तीची तोडफोड केल्याचे कबुल केले. अधिक चौकशी मध्ये तो नागपूर येथील रहीवाशी असल्याचे व तो मागील एक महीण्यापासुन घरामधुन निघुन असाच भटकंती करत असल्याचे दिसुन आले आहे. सकृतदर्शनी सदर इसम हा मनोरूग्न असल्याचे दिसुन येत असुन त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.psychedelic

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजा पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड, सपोनि. रमीज मुलानी, स.फौ. सलीम शेख, पो.हवा. आनंद परचाके, सुधाकर वरघने, सतिष पाटील, लेकेश नायडू, ना.पो.कॉ. सत्यवान कोटनाके, पो. कॉ. शेखर मातनकर, दिलीप आदे श्रीनिवास वाभिटकर, प्रसन्ना, मणेकॉ सिमा पोरते, चालक ढबस पोस्टे बल्लारपूर यांनी केली असून पुढील तपास पो. नि. उमेश पाटील हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment