Ads

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची वाहन रॅली

चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्त्वात देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५ वाजता शहरात वाहन रॅली काढण्यात आली. मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा कस्तुरबा चौकातील शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालय परिसरात समारोप झाला.
Chandrapur City District Congress Committee vehicle rally in support of Bharat Jodo Yatra
कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. सध्या या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू आहे. या यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज वाहन रॅली काढण्यात आली. कस्तुरबा चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट, दीक्षाभूमी, वरोरा नाका चौक, बसस्थानक, तुकुम, बंगाली कॅम्प यासह अन्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा कस्तुरबा चौकात समारोप करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरात सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले होते.
देशात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय राज्यघटनेमुळे देशात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद टिकवून ठेवता आला आहे. परंतु, सध्या भारतीय राज्य घटनेला धोका निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यातून देशातील एकतेला धोका निर्माण होऊ शकते. देशात सध्या तानाशाही व्यवस्था निर्माण झाली आहे. देशातील विस्थापित हे विस्थापित आहेत. तर, दुसरीकडे देशातील निवडक प्रस्थापितांकडे संपत्ती केंद्रित करण्याचा कार्यक्रम राबविला जात असल्याची टीका खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केली.
रॅलीत खासदार बाळूभाऊ धानोरकर, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू काळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीताताई अमृतकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, ज्येष्ठ नेते के. के. सिंग, प्रदेश सचिव विजय नळे, माजी सभापती संतोष लहामगे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रवीण पडवेकर, ओबीसी विभागाचे उमाकांत धांडे, नरेंद्र बोबडे भालचंद्र दानव, सोहेल शेख, गोपाल अमृतकर, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोब्रागडे, निशा धोंगडे, चंदा वैरागडे, संजय गंपावार, सचिन कत्याल, संदीप सिडाम, पप्पू सिद्दिकी, नौशाद शेख, राजवीर यादव, रवी भिसे, ताज कुरेशी, दुर्गेश कोडाम, युसूफ चाचा, राजू खजांची, मोहन डोंगरे, दौलत चालखुरे, वसीम शेख, आमिर शेख, पिंटू शिरवार, रेवल्लीवारजी, पितांबर कश्यप, केतन दुर्सेलवार, कासिफ अली, पूजा अहुजा, गौस खान, मंगेश डांगे, तवंगर खान, मोनु रामटेके, स्वप्नील चिवंडे, सागर खोब्रागडे, राहुल चौधरी, ताजु शेख, राजू वासेकर, अखिल कुरेशी, इरफान भाई, दीपक मद्दीवार, रवी रेड्डी, विनोद वाघमारे, शुभम कोराम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment