Ads

नवसारीतील निवडणुक प्रचारात ना.सुधीर मुनगंटीवार यांना उत्तम प्रतिसाद

नवसारी, गुजरात: नवसारीतील निवडणुक प्रचारात महाराष्ट्राचे वने , सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. जनतेचा प्रतिसाद पाहाता नवसारीतील भाजपा उमेदवार श्री राकेश देसाई हे विक्रमी मतांनी विजयी होतील अशी खात्री ना.श्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Good response toMin.Sudhir Mungantiwar in election campaign in Navsari

गेली जवळपास 27 वर्षे नवसारीत भाजपा उमेदवार विजयी होत असून प्रत्येक निवडणुकीत मताधिक्यात विक्रमी वाढ होत आहे. याहीवेळी ही परंपरा कायम राहिल असा विश्वास ना.श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी दुपारी वंदे भारत एक्सप्रेसने ना.श्री मुनगंटीवार यांचे सूरत येथे आगमन झाले आणि तेथून ते थेट नवसारीतील डीआर फार्म येथे जाहिर सभेसाठी रवाना झाले. भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. त्यांनंतर स्थानिक कार्यकर्त्यांशी ना.श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला.

दुपारी उशीरा नवसारीचे नगराध्यक्ष जिगीशभाई शाह यांच्या घरी बुथप्रमुख आणि महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर एका हिरे कारखान्यातील कामगार प्रतिनिधींशी ना.मुनगंटीवार यांनी संवाद साधला. नंतर एका नुक्कड सभेस त्यांनी संबोधित केले. काल संध्याकाळी उशीरा सरस्वती नगर, सिंधी कॉलोनी इत्यादि परिसरात घरोघरी संपर्क करण्यात आला. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या भेटीवर भर देण्यात आला होता. या पदयात्रेसही रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुजरातेतील भाजपा सरकारने विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केली असून नागरिकांनी पुन्हा भाजपाला विक्रमी मतदान करत या कामगिरीची पावती द्यावी असे आवाहन ना.श्री. मुनगंटीवार यांनी नागरिकांशी बोलतांना केले. त्यानंतर रात्री उशीरा भाजपा मध्यवर्ती निवडणुक कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी एकूण निवडणुक नियोजनाचा आढावा घेतला आणि काही मौलिक सूचनाही केल्या.

नुक्कड सभा, पदयात्रा, घरोघरी संपर्क, बुथ प्रमुख बैठक, लोकप्रतिनिधींची बैठक, विविध आघाड्यांच्या बैठका, विविध सामाजिक संघटना आणि समाजातील प्रभावी व्यक्तींच्या भेटीगाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भेटी अशी ना.मुनगंटीवार यांच्या प्रचार दौऱ्याची साधारण रूपरेखा आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment