Ads

शेत शिवारात मृत अवस्थेत आढळला बिबट्या

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:- sindewahi सिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही मार्गावरील पवनपार समोरील कन्हाळगाव येथे रविवार दिनांक 20 नोव्हेंबर सकाळी दहा वाजताचा सुमारास जंगल परिसरामध्यील शेत शिवाराचा रस्त्यालगत बिबट्या leopard मृत Dead अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार समोरील कन्हाळगाव शेतपरीसरातील वनक्षेत्र रस्त्यालगत नर जातीचा अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला.A leopard was found dead in the field

या मृत बिबट्याची माहिती उपस्थितांनी जवळील सिंदेवाही वन विभागाला कळविली. माहिती मिळताच येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर यांनी आपल्याकडे असलेले आर.आर. यु. पथक तसेच वन सहाय्यक यांना ताबडतोब घटनास्थळी बोलावले तसेच स्वतः हजर होत . सदर घटनेच्या पंचनामा केला. या मृत बिबट्याचा मृत्यू झुंजी मध्ये झाला असावाअसा प्राथमिक अंदाज वन परिक्षेत्रअधिकारी सालकर यांनी सांगितलेला आहे. मृत बिबट्याचे सर्व अवयव साबुत असून डॉ. विनोद सुरपाम पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही हे बिबट्याचे शवविच्छेदन केले असल्याची माहीती देण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment