चंद्रपुर :जेष्ठांचा आदर करत त्यांच्या मार्गदर्शक विचारांवर चालणारा समाज सर्वोत्कृष्ठ असतो. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी जेष्ठांच्या विचारांचे अनुसरण करण्याची गरज असते. जेष्ठांचा आर्शिवाद हिच खरी संपत्ती आहे. ७५ वर्ष पुर्ण झालेल्या जेष्ठांचा हा सत्कार कार्यक्रम म्हणजे समाजाला त्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करणार कौतुकास्पद उपक्रम आहे. श्री वर्धमान सोशल एंड एजुकेशन अकॅडमीने सुरु केलेली हि सुरवात प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.Shri Vardhaman Social and Education Academy
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त श्री वर्धमान सोशल एंड एजुकेशन अकॅडमीच्या वतीने जैन भवन येथे सकल जैन समाजातील जेष्ठांच्या अमृत सन्मान 2022 या सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर, निर्दोष पुगलिया, योगेश भंडारी, सुभाष जैन, गुलाबराव खंडाळे, राहुल पुगलिया, ओसवाल आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि, जेष्ठांकडे असलेल्या विचारांच्या ठेवीची समाजाला मोठी गरज आहे. सार्वजनिक जिवण जगत असतांना जेष्ठांना अनेक अनुभव येतात आणि त्यांच्या या अनुभवातच यशाचा मार्ग लपला असतो. आपल्या परिवारात असलेल्या जेष्ठांसोबत आपण वेळ घालवीला पाहिजे. त्यांच्या सोबत चर्चा केली पाहीजे. त्यांच्या अनुभवाच्या पुंजीत प्रत्येक अडचणीतुन यशस्वी मार्ग दाखवीण्याची क्षमता आहे.
आजच युग माॅडन होत चालल आहे. अशात जेष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. जेष्ठांना योग्य वागणुक दिल्या जात नसल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र हे योग्य नाही. हालाकीच्या परिस्थितीत जगत असलेल्या जेष्ठांच्या सन्मानासाठी आपल्याला समोर येणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जैन समाज हा सामाजिक बांधिलकी जपणारा समाज आहे. जेष्ठांचा आदर करणारा समाज आहे. समाजाने सुरु केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यातुन अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. सुरु झालेला हा उपक्रम शहर पातळीवर आहे. मात्र पूढच्या वर्षी हा उपक्रम जिल्हा स्तरावर आयोजीत करत जिल्ह्यातील ७५ वर्षांच्या जेष्ठांचा सन्मान करा असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजबांधवांना केले आहे. सदर कार्यक्रमात ७५ वर्षांवरील जेष्ठांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment