Ads

देशी दारूचे दुकान फोडून देशी दारूच्या पेट्यासह लाखोंचा ऐवज लंपास

(प्रशांत गेडाम)नागभिड - नागभीड अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे दुकान (Country liquor store) फोडून एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यासंदर्भात नागभीड पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.After breaking the country liquor shop and looting lakhs of rupees with boxes of country liquor
सविस्तर वृत्त असे की ,गुरुवारी सुलेझरी येथील आर.एस. वंजारी यांचे देशी दारू दुकान बंद करून दुकानातील व्यक्ती घरी गेले असता रात्री अज्ञात इसमांनी देशी दारू दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. कपाटात व काउंटरमध्ये ठेवलेले ७५ हजार ४३० रुपये, १२ हजार रुपये किमतीचा जुना वापरता ऐंडराईड एलसीडी आणि २७ हजार १८० रुपये किमतीच्या ९ पेट्या देशी दारू असा एकूण एक लाख १५ हजार २४० रुपयांचा माल लंपास केला.याची तक्रार नागभीड पोलीसNagbhid Police स्टेशन येथे दिली असुन सदर चा आरोपी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 457, 380 भा.द.वी नुसार गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास नागभिड पोलीस निरीक्षक मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment