भद्रावती (तालुका प्रतिनिधी):
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अ॑तर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टीग क्रिडा स्पर्धेत श्री साई कॉन्व्हेन्ट सि.बी.एस. इ .चा खेळाडू महक्ष दुधे यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे.State Level Weightlifting Competition
महक्ष दुधे हा खेळाडू वर्ग 9 वा चा विद्यार्थी असुन याची 17 वर्षाआतील मुलांच्या वेटलिफ्टीग स्पर्धेत राज्य स्तरावर निवड झाली. त्याने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल बडकेलवार क्रीडा शिक्षीका अलोका बिश्वास अमोल बडकेलवार शाळेतील शिक्षक वृंद आणि आई वडिल यांना दिले. या खेळाडुचे अभिनंदन स॑स्थेचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार आणि रूपा गु॑डावार यांनी केले तसेच पुढील खेळाकरीता शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment