Ads

लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या मुलींचा संघ 17 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी

भद्रावती तालुका प्रतिनिधी :   District Sports Complex Chandrapur जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय 17वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात सर्वोदय विद्यालय सिंदेवाही या संघावर सात गडी राखून अंतिम सामन्यात विजय मिळविला .यानंतर नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य विद्यालय हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Girls' team of Lokmanya Vidyalaya Bhadravati won the under 17 cricket tournament at the district level
लोकमान्य भद्रावतीच्या विजेत्या संघात अमोली गेडाम, अवंतिका नागोसे, अश्विनी खुटे माटे, उमादेवी आस्वले, चंचल नागपुरे ,चित्रा वडस्कर, जान्हवी बोरीकर, तेजस्वी रोडे, अनन्या खारकर, धनश्री डाहुले ,प्रिया ढेंगळे, यशस्वी आ, राजश्री गेडाम ,लक्ष्मी बदखल , श्रावणी बोम्मावर या खेळाडूंचा सहभाग होता. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना दिले. विजयी संघाचा लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे तसेच शिक्षक प्रिया भास्करवार, सचिनकुमार मेश्राम ,विशाल गावंडे ,रवी नंदनवार, मयूर पोटे यांनी उपस्थित होते. खेळाडूंचे कौतुक केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment