भद्रावती तालुका प्रतिनिधी-एका अज्ञात वाहणाने स्कुटीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका ४५वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला.सदर घटना ही भद्रावती-वरोरा हाय वे वरील कोंढा फाट्यावर दिनांक ४ला रात्री साडेदहा वाजता घडली.प्रशांत प्रभाकर शिंगरे,वय ४५वर्ष,राहणार संतकृपा नगरी वरोरा असे या मृत इसमाचे नाव आहे.45-year-old Man died in a collision with vehicle.
घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच त्यांनी आवश्यक ती कार्यवाही पुर्ण करुन अज्ञात वाहणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सदर मृतक प्रशांत हा आपल्या प्लेझर या स्कुटी गाडीने भद्रावतीकडून वरोरा शहराकडे आपल्या घरी जात असतांना कोंढा फाट्यावर एका अज्ञात वाहणाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघाताचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment