भद्रावती तालुका प्रतिनिधी :
भद्रावती शहरातील शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावरील निर्माणाधीन असलेल्या एका बारमधुन अज्ञात चोरट्यांनी 48 हजार 935 रुपयांचे साहित्य लांबविले.सदर घटना दिनांक 15 रोज गुरुवारला उघडकीस आली.
या घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Material worth Rs 48 thousand 935 stolen from an under construction bar in Bhadravati.
शहरातील आनंद तागडे यांच्या बारच्या ईमारतीचे काम शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर सुरु आहे.त्यासाठी लागणारे साहित्य तागडे यांनी या ईमारतीत ठेवले होते.अज्ञात चोरट्यांनी घटनेच्या रात्रोला ईमारतीत प्रवेश करुन आत ठेवलेले जगवार कंपणीचे फ्लैशव्हैलू मेट्रोपोल,एम आर स्टीक बार, युरीनल,बेसीन, कमोड सीट,टाइल्स पावडर,सिमेंट बैग,लोखंडी खिडकी फ्रेम,झेरॉक्स मशीन दुरुस्ती किट असे साहित्य चोरुन नेले.या साहित्याची किंमत 48 हजार 935रुपये एवढी आहे.दुसऱ्या दिवशी आनंद तागडे हे बारमधे आले असता त्यांना ही चोरी झाल्याचे आढळून आले.त्यांनी या प्रकाराची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात केली.पोलीसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली.भद्रावती पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.
0 comments:
Post a Comment