चंद्रपुर :तहसील कार्यालय हे सेवेचे केंद्र आहे. मात्र येथे सुरु असलेल्या गैरप्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहे. महत्वाचे कागदपत्र बनविण्यासाठी येथे गेलेल्या नागरिकांची हेडसांड होत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी नि:शुल्क सेवा देणारे कर्तव्य सेतु केंद्र सुरु करण्याचा निर्धार आपण केला होता. आज हे सेतू केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सुरु होत असल्याचा आनंद असुन कर्तव्य सेतु केंद्राच्या माध्यमातुन आपण नागरिकांना नि:शुल्क सेवा देणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कर्तव्य सेतु केंद्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपीन पालिवाल, आयएमएचे अध्यक्ष डाॅ. अमल पोद्दार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, मुस्लीम हक्क संघर्ष समीतीचे अनवर अली डाॅ. वासुदेव गाडेगोणे, डाॅ. अशोक वासलवार, डाॅ. इमरान अली शिवजी, शैलेंद्र शुक्ला, अजय जयस्वाल आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आपण लोकोपयोगी अनेक सामाजिक उपक्रम सुरु केले आहे. नैसर्गिक आपत्तीने घर कोसळल्यास त्यांना आर्थिक मदत, अम्मा का टिफीन या उपक्रमा अंतर्गत गरजुंना जेवनाची व्यवस्था आपल्या वतीने केल्या जात आहे. आता कर्तव्य सेतु केंद्राच्या माध्यमातुन आपण महत्वाची कागदपत्र काढण्यात अडचणी येत असलेल्या नागरिकांना नि:शुल्क सेवा उपलब्ध करुन देत आहोत. या सेतु केंद्रातून निराधार कार्ड, जाती प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना प्रमाणपत्र यासह ईतर महत्वाचे कागदपत्र बनवून दिल्या जातील. हा एक अभिनव असा उपक्रम असुन यातुन अनेक गरजुंना मदत मिळणार आहे. याचा नागरिकांनीही मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी मनपा आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले कि, आमदार किशोर जोरगेवार यांच्या तर्फे राबविण्यात येणा-र्या उपक्रमांमध्ये सामाजिक बांधीलकी असते. त्यांचे उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरतात. त्यांच्या कल्पनेतुन चंद्रपूरात सुरु झालेले हे कर्तव्य सेतु केंद्र अनेकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या उपक्रमातून त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक संदेश दिला असल्याचे ते म्हणाले.
*विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन*
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेड व सामाजिक संघटनांच्या वतीने दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त आज योग नृत्य परिवाराच्या वतीने आजाद बाग आणि लालपेठ काॅलरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. तर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घुस आणि चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असल्याचा संदेश दिला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, हरमन जोसेफ, जितेश कुळमेथे, वैशाली मेश्राम, कल्पना शिंदे, दिनेश इंगळे, प्रतिक हजारे, मुकेश गेडाम यांच्यासह युथ आघाडीच्या पदाधिका-र्यांनी परिश्रम घेतले. तर शांतीनाथ सेवा मंडळाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात येथे ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथे गरजुंना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
0 comments:
Post a Comment