Ads

घरफोड्या व मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला सिंदेवाही पोलिसांनी घेतले ताब्यात

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही Sindewahipolice पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे घरफोडी चोरीच्या गुन्हा दाखल होताच
सिंदेवाही पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान करत आरोपीच्या शोध घेत चोरी प्रकरणातील फरार आरोपी नामे शुभम प्रल्हाद शेंडे, वय 26 वर्ष, रा. चामोर्शी रोड, कॅम्प एरिया, गडचिरोली, हा चंद्रपुर परिसरात मिळून आला असून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलीआहे .तेव्हा सदर आरोपिकडुन एक बिना नंबरची HF Deluxe मोटार सायकल, एक बिना नंबरची एक सुझुकी एक्सेस मोपेड गाडी या सर्व वाहने जप्त करण्यात आली आहे.
Sindewahi police arrested the inn thief who burglarized houses and stole motorcycles
व आरोपीने घरफोडी गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल गडचिरोली येथे त्याचे घरी लपवून ठेवल्याचे कबुली दिल्याने आरोपीचे घरून सदर घरफोडी गुन्हयातील चोरी मुद्देमाल 1 लाख 85 हजार रुपये
असा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन ला दि. 20/09/2022 रोजी अप क्र 243/2022 कलम 379 भादवि अनव्ये गुन्हा नोंद असून सदर
चोरीस गेलेली पॅशन प्रो मोटार सायकल क्र MH 34 AT 1641 असा एकूण 3,15,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाणेदार योगेश घारे ,पोलीस हवालदार बावणे, ज्ञानेश्वर डोकळे,राहुल रहाटे, मंगेश मातेरे, रणधीर मदारे ,अरविंद मेश्राम यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment