मूल ता.प्रती (नासीर खान):
जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि तालुका कराटे-डो असोसिएशन मूल ला संलग्नित कराटे अँड फिटनेस क्लब मूल च्या एकूण दहा खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. 10 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पार पडली ह्या स्पर्धेत क्लब च्या दहा पैकी आठ खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आणि त्यांची निवड विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धेकरिता झालेली आहे.Athletes of Karate and Fitness Club Mul won the district level school karate competition and were selected for the division level competition
विजयी झालेल्या खेळाडूंमध्ये सेंट अँन्स हायस्कूल,मूल चे 14 वर्ष आतील मुलींमध्ये आस्था खैरे (-34 की.ग्रा), यशस्वी येनुगवार (-38 की.ग्रा),धरती भोयर (-46 की.ग्रा) मुलांमध्ये रुद्र सोयाम (-55 की.ग्रा), 17 वर्ष आतील मुलींमध्ये दिव्या नरड (-44 की.ग्रा); सेंट अंन्स पब्लिक स्कूल ,मूल ची 17 वर्ष आतील मुलींमध्ये विधी कोटकोंडावार (-48 की.ग्रा); माऊंट कॉन्व्हेंट & ज्यू. सायन्स कॉलेज मूल चे 17 वर्ष आतील मुलांमध्ये नैतिक धोबे (-45 की.ग्रा) ; सुभाष प्राथमिक शाळा, मूल ची 14 वर्ष आतील मुलींमध्ये प्रणाली झरकर (+50 की.ग्रा) ह्यांचा सहभाग आहे तर नवभारत कन्या विद्यालय मूल ची 14 वर्ष आतील मुलींमध्ये प्रीती भंडारे (-42 की.ग्रा) हि द्वितीय व माऊंट कॉन्व्हेंट & ज्यू. सायन्स कॉलेज मूल चा 17 वर्ष आतील मुलांमध्ये मित खोब्रागडे (-50 की.ग्रा) ह्याला चतुर्थ स्थान मिळाले.
प्रथम क्रमांक पटकावलेले आठही खेळाडू विभागीय स्तरावर आपापल्या वय आणि वजनगटात जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
वरील सर्व खेळाडू कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम ह्यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात.विजयी सर्व खेळाडूंना जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख तथा क्लब चे मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे सर यांनी आशीर्वादसह शुभेच्छा दिल्या आणि पालकांकडून तसेच मूल तालुका क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी मॅडम,तालुका क्रीडा संयोजक नामदेव पीजदूरकर सर, तालुका कराटे-डो असोसिएशन मूल चे सर्व पदाधिकारी व शाळेतील शिक्षकवृंदानी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
0 comments:
Post a Comment