Ads

कुख्खात मोटार सायकल चोर पिन्टू कडुन 14 मोटार सायकल केल्या जप्त

चंद्रपुर :दि. ११ / १२ / २०२२ रोजी पो.हवा. प्रकाश बलकी, पो.हवा नितीन साळवे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना गोपनिय खबर मिळाली की एक इसम एक मोटारसायकल बिना कागदपत्राची विक्री करण्याच्या उद्देशाने बस स्टैंड वरोरा येथे गिराईक शोधत फिरत आहे. अशा खबरेवरून लागलीच पो उप नि अतुल कावळे, हवा, प्रकाश चलकी पो. हवा. नितीन साळवे, नापोशि सुभास गोहोकार, पोशि सतिश बगमारे, मिलींद जांभुळे यांचे पथक बस स्टॅंड वरोरा येथील घटनास्थळी गेले असता एक संशयीत इसम हा स्वताच्या ताब्यात एक जुनी वापरती हिरो होन्डा एलेंडर मोटार सायकल क. MH 40-1-7839 सह मिळून आला. त्याला नाव नव पत्ता विचारला असता अमर उर्फ पिन्टू पुरूषोत्तम मेश्राम, वय २६ वर्षे रा. उमरी ता. वरोरा जि. चंद्रपूर ह.मु. बुटीबोरी जि. नागपूर असे सांगितले
14 motorcycles seized from a motorcycle thief pintu
त्यास सदर मोटार सायकल कोन आपला व कागदपत्रे कुठे आहेत याबाबत विचारपुस केली असता उडवा उडवीचे उत्तर देवु लागल्याने त्यास बारकाईने सविस्तर विचारपुस केली असता अदाजे एक वर्षापूर्वी चिमुर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्यावरून त्यास आणखी ईतर गुन्हयाबाबत विश्वासात घेवून विचारास केली असता आरोपीने चिमूर, सिदेवाही, भद्रावती, बेला हिंगनघाट, कुही, नंदोरी, वणी, बुटीबोरी व इतर ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितल्याने खालील प्रमाणे मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहे.
1.MH-34 AZ-8607,
2.MH-34-AN-1012
3.MH-34-AD 0565
4.MH-49-S-6528
5.MH-32-V-7497
6. MH-40-AF-5917 7. MH-32-AB-6631 बनावटी क्र.MH-32 AM 9247
8.MH-29-2-5907
9.MH-36-P-2409
10 MH-40-2-6320
11.MH-29-AE-605-
12 .MH-33-U-2904 बनावटी क्र.MH-34 9247 असा एकुण ४,२०,००० /-रू चा मुद्देमाल जप्त केला व आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन
चिमुर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंग परदेशी, मा. प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंदु यांचे मार्गदर्शनखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बहर यांचे नेतृत्वात स.गो.नि जितेंद्र बोबडे, स.पो.नि सन्दीप कापडे, पो.उप.नि अतुल कावळे, पो. हवा. प्रकाश वलको पौ हवा. नितीन साळवे नापोशि सुभास गेहोकार, पोशि सतिश बगमारे, मिलींद जांभुळे, चालक पी. हवा, प्रमोद डंभारे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. चिमुर येथील पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment