चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सावली तालुक्यात वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केले. २०२२ या एका वर्षातला हा ५० वा बळी ठरला आहे.
Tigers killed 50 people in one year
काल बुधवारी वाघाने मूल व सावली तालुक्यात दोन जणांचे बळी घेतले. या दोन घटनांमुळे दहशत पसरली असतानाच आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता खेडी येथे स्वरूप प्रशांत येलेटीवार (५०) या महिलेला वाघाने ठार केले. शेतात कापूस काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
एका वर्षात वाघांनी विविध घटनांमध्ये ५० जणांचे बळी घेतल्याने नागरिकांमध्ये वन खात्याविरोधात प्रचंड रोष आहे. माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वाघांचा बंदोबस्त तत्काळ केला नाही तर राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनीदेखील- वन खात्याला वाघांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे अन्यथा निलंबनाची कारवाई–वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्हयात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
दिनांक १४ डिसेंबर रोजी मुल तालुक्यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्यात बाबुराव कांबळे व १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. त्याआधी ७ डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्याची आवश्यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.
0 comments:
Post a Comment