(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:मॉर्निंग वाकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना सिंदेवाही शहरा जवळील असलेल्या रेल्वेस्टेशन समोरील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर समोरील रोडवर आज गुरुवार दि. 15 डिसेंबर ला सकाळी 6 च्या सुमारास घडली.
नंदू सिताराम शेंडे वय - (५०)असे हल्ला झालेल्या जखमी इसमाचे नाव असून ते सकाळी फिरण्यासाठी गेले असता अचानक समोरासमोर आल्याने अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही डोळ्यांना व नाकाजवळ आणि डाव्या कुशीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचावर ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लगेच वनपरिक्षेत्रव त्यांची चमू घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सालकर यांच्या नेतृत्वात वनविभाग करीत आहे.
0 comments:
Post a Comment