Ads

20 कोटी रुपयातुन होणार ग्रामिण भागातील रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

चंद्रपुर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामिण भागाच्या रस्त्यांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतुन ग्रामिण भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. निधी मंजूर केल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभार मानले आहे.
Roads in rural areas will be concreted at a cost of Rs 20 crore
चंद्रपूर मतदार संघातील विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे. या भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन शहरी व ग्रामीण भागात विकासकार्य सुरु आहे. दरम्याण ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय राखीव निधीतुन 20 कोटी रुपये मंजुर करण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना केली होती. या मागणीची दखल ना. नितीन गडकरी यांनी घेतली असून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून साखरवाही - येरुर - वांढरी एमआयडीसी - दाताळा या 10 की.मी. पर्यंतच्या मार्गाचे 10 कोटी रुपये खर्च करुन काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तर शेनगाव - उसेगाव - वढा - धानोरा - पिपरी - मारडा - शिवनी या 10 कि.मी. मार्गाचे 10 कोटी रुपये खर्च करुन काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अगोदरही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मागणीची दखल घेत निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment