Ads

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेबांनी मराठी माणसाला स्वाभीमानाने जगण्यासाठीचा आत्मसन्मान दिला-गोंडवाना सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे

चंद्रपूर - महाराष्ट्रात आज मराठी माणसालाजी प्रतिष्ठा व आदर मिळतो आत्मसन्मान मिळतो तो श्रद्धेय हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मिळतो आहे आता मराठी माणसांनी तो टिकविण्याची खबरदारी घ्यावी व ताठ मानेने जगावे तसेच साहेबांनी दिलेल्या समाजकार्याचं बाळकडू नवीन पिढिंना देऊन लोकांच्या सहकार्यासाठी सदैव कार्यरत राहावे असे प्रतिपादन माजी युवासेना जिल्हा प्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांनी केले ते विकलांग सेवा संस्थाच्या वतीने स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्तसाधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. Hindu Hrudayasamrat His Highness Balasaheb gave self-respect to Marathi people to live with self-respect- Gondwana Senate Member Prof. Nilesh Belkhede
यावेळी वर्षा कोठेकर यांनी संस्थेच्यावतीने सिनेट सदस्य नियुक्तीबद्दल प्रा. निलेश बेलखेडे यांचा ग्रंथ, नववर्ष डायरी,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला तसेच निलेश बेलखेडे यांच्या हस्ते परिसरातील निवडक २० मुली व गृहिणींमा पादत्राने वितरित करण्यात आली तसेच शिवभोजन लाभार्थ्यांना वर्षा कोठेकर द्वारा मिष्ठान्न पुरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, पूर्वा मेडपल्लीवार, अशोक खाडे, संजय डाखोरे,आचल थोरात,वैष्णवी वाटेकर यांनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment