Ads

शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या-येणाऱ्या हायवा ,ट्रक वाहनांना 'ब्रेक' लावा

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर सध्या हायवा ट्रक चालक तालुक्यातील रेती घाट कडून सिंदेवाही शहरात सुसाट वेगाने येत असतात. त्यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने हायवा ट्रक चालक मुजोरीने ट्रक चालवितात. एक महिन्यात परीसरातील गावा जवळ दोन अपघात सुसाट वेगाने रेती नेत असलेल्या हायवा ट्रक मुळे झाले. यामध्ये दोघांचा जीव गेला. या मार्गावर वाहनांना ब्रेक कोण लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.Put 'brake' on the highway, truck vehicles going and coming at high speed in the city
सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकातुन सुसाट वेगाने हायवा ट्रक जात असतात. या ठिकाणीही अपघात होण्याची शक्यता आहे.
गौण खनिज हायवा ट्रक ने वाहतूक करतांना अर्धवट झाकलेले असल्याने हवेत उडून ग्रामस्‍थांच्‍या डोळ्यात रेती व गिट्टीची धुळ जात आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना, छोट्या वाहनचालकांना व पायी प्रवास करणाऱ्यांना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा व डंपरमुळे लहान मोठ्या शारिरिक इजा व अपघातांचा सामना करावा लागतो आहे. आरटीओने येथे फिरते पथक नेमून याची दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थां कडुन व शहरातील नागरिक तसेच गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
सिंदेवाही बसस्थानकावरून शाळा, कॉलेजची मुले ये-जा करीत असतात. तसेच रस्ता ओलांडताना दुचाकी किंवा चारचाकी वाहनधारकांनाही धोका असतो. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सुसाट वाहनांवर कारवाई संबंधित अधिकाऱ्याने करावे अशी मागणी केली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment