Ads

पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्याला तत्वतः मंजुरी

ता.प्रतिनिधी कोरपना:मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहनाऱ्या पैनगंगा नदीवर सात उच्च पातळी बंधाऱ्यानां राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. यामुळे १० हजार ६०० हे.जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाला यश आल्याने मराठवाडा विदर्भात काही जिल्याह्यात लाभ होणार असल्याने त्या भागात शेतकऱ्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.In-principle approval of high level seven barrage on Panganga river
पैंनगंगा नदी ही हिंगोली ,नांदेड, यवतमाल,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्याची जीवन वाहिनी आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील औद्यौगिक विकास ,पेयजल योजना,वीज निर्मिती प्रकल्प सिमेंट उद्योगाला पाणी पुरवठा योजना या नदी वर कार्यान्वित आहे.गेल्या ३ दशकापासून राजुरा,चंद्रपूर,वणी पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे व्हावे म्हणून मागणी आहे नरेश बाबु पुगलिया शिवाजीराव मोघे प्रभाकरराव मामुलकर वामनराव चटप सुदर्शन निमकर वामनराव कासावार संजय धोटे माजी खासदार आमदार इत्यादी नी मागणी केली होती सध्या शासनात असलेले आमदार सुभाष धोटे किशोर जोरगेवार बोतकुलवार व जिल्हयाचे कर्तबगार पालकमंत्री म्हणून ख्याती असलेले सुधीर मुनगंटीवार हयाचा मतदार क्षेत्रालगत नदीकाठावर लाभक्षेत्र लागून आहे. ही मागणी नेहमी चर्चेत राहली मात्र वनोजा,शिवणी, बॅरेजसाठी पाटबंधारे विभागाने पाहणी करून प्रथम २००४ मध्ये नकाशा मंडळ नाशिक यांना प्रस्ताव दिला ते धूळ खात पडले आहे.तर घाटंजी पैनगंगा अप्पर प्रकल्प दोन दशका पासून कासवगतीने सुरु आहे.चंद्रपूर यवतमाळ जिल्हयातील शेती,उद्योग क्रांतीमुळे धोक्यात आली तर सिचंना अभावी हरीत क्रांती दिव्य स्वप्न ठरले प्रदूषण,तापमान,हवामान बदल यामुळे सिंचना शिवाय पर्याय नाही हि वास्तविकता असल्याने चंद्रपूर जिल्हयात शिवनी,वनोजा,परसोडा या भागात उच्च पातळीचे बंधारे निर्माण करण्याची नितांत गरज असताना एकही बंधारा मंजूर न झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्या गेले.येथे उद्योगाला लागणारे पाण्याची गरज व सिंचनासाठी लाभ होणार असल्याने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांना निवेदना द्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आबिद अली यांनी लक्ष वेधले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment