Ads

ग्रामीण पत्रकारांनी कुणालाही न जुमानता सत्य मांडत निर्भिड पत्रकारीता करावी- खा. बाळूभाऊ धानोरकर

चंद्रपुर :-पत्रकार हा समाजाचा दर्पण( आरसा) आहे. सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीसाठी कर्तव्य पालनाचे दिशादर्शक म्हणून पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण असते. व्यवस्थेवर अंकुश घालणारा घटक म्हणूनही संपूर्ण समाज पत्रकारांविषयी सन्मानजनक दृष्टीकोन ठेवून असतो. विश्वासपात्र घटक या नात्याने पत्रकार आणि पत्रकारीतेकडे बघितले जाते. त्यामुळे पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे या स्तंभाची सेवा केली पाहिजे. ग्रामीण पत्रकारांवर जबाबदारीचे फार मोठे ओझे असल्याने त्यांनी कोणत्याही शक्तीचे दडपण येऊ न देता लेखनीतून सत्य आणि विधायक स्वरुपाची पत्रकारीता करून लोकशाही मुल्यांना बळकट करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.Rural journalists should do fearless journalism by presenting the truth without favoring anyone.MP. Balubhau Dhanorkar
स्थानिक एन.डी हॉटेल येथे दि. ८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा द्वारा आयोजित पत्रकार मेळावा व गुणवंत पाल्य व सेवाभावी पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याला उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रश्न आणि अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्न करू असे आश्वासन खासदार धानोरकरांनी आपल्या भाषणातून दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलनाने व महापुरुषांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहल सिरसाट हिने स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर खा. बाळूभाऊ धानोरकर, आ. किशोर जोरगेवार,
पदवीधर मतदार संघाचे आ. अभिजित वंजारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष गजानन वाघमारे, राज्य सचिव राजेश डांगटे ,राज सहसचिव अविनाश राठोड, राज्य प्रवक्ते अनंतराव गावंडे जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय जाधव, अनंतराव गावडे, वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक श्री संजय वैरागडे, वरिष्ठ पत्रकार संजय तायडे अध्यक्ष चंद्रपुर प्रेम क्लब ,मजहर अली अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ ,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, प्रभृतीची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी ग्रामीण पत्रकारांच्या आजवरच्या वाटचालीची माहिती विषद करताना ग्रामीण पत्रकार संघापुढील प्रश्न, त्यांच्या अडचणी विषद केल्या. ग्रामीण पत्रकारांना निर्भिडपणे पत्रकारीता करता यावी म्हणून शासनाने पत्रकारांच्या संरक्षणा प्रभावी कायदे करण्याची मागणी केली.
आ. किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण पत्रकारांच्या राष्ट्र व समाज घडविण्यासाठीच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा करीत पत्रकारीतेचा मुख्य दुवा असणाऱ्या या पत्रकारांच्या न्यायोचित मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात समस्यांचा डोंगर असतो. त्यामुळे समाजातील दारिद्रयात जीवन जगणाऱ्या, रात्रंदिवस शेतात घाम गाळणाऱ्या शेतक-यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे महत्कार्य ग्रामीण पत्रकार
आपल्या लेखनीद्वारे करित असल्याने तोच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची सेवा करतो व तिचे संवर्धन करतो असे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी मान्यवर अतिथीच्या शुभहस्ते हिमांशु पन्नासे (क्रीडा क्षेत्र), गुंजण आवारी (शैक्षणिक), वनिता धुमे (महिला सक्षमीकरण), स्नेहल शिरसाट ( गायन), मिशिका कामतवार ( क्रीडा), रामकृष्ण रायपुरे (पत्रकारीवा व गीत गायन), चेतन शर्मा (सामाजिक क्षेत्र) यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला.
ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल स्वामी सावली, शंकर चव्हाण जिवती, मुमताज अली कोरपना, अश्फाक शेख वरोरा, लक्ष्मीकांत कामतवार सिंदेवाही, दुर्योधन धोंगडे मुल,जीवनदास गेडाम पोंभुर्णा ,सुरेश डांगे चिमुर यांच्या पत्रकारितेतील अमूल्य योगदानांबद्दल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विनोद पन्नासे तर मान्यवरांचे आभार पुरुषोत्तम चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारीनितील सर्वश्री. कुकु सहानी कार्याध्यक्ष ,अनिल देठे उपाध्यक्ष, महासचिव पुरुषोत्तम चौधरी ,सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे , मार्गदर्शक धर्मेश निकोसे,सहसचिव प्रभाकर आवारी, प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे,सदस्य नवज्योत झाडे ,अजय गणवीर, सी.आर.टेंभरे,अशोक गुरुवाले, विक्की गुप्त, विजय बोरगमवार, महावीर लोहकरे, दुधनाथ चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment