Ads

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरनी चरस बाळगणाऱ्यांवर केली कारवाई

चंद्रपुर :- Crime News दि.12/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बळासाहेब खाडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, घुग्घूस येथील एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणलेला असुन तो विक्री करीत आहे. अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे स.पो.नि. मंगेश भोयर यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना पाचारण करून छापा घालण्याबाबत मार्गदर्शन केले.Local Crime Branch, Chandrapur took action against charas holders
स.पो.नि.मंगेश भोयर यांचे पथक, पंचासह घुग्घूस येथे जावून मिळालेल्या खबरे प्रमाणे आरोपी वतन लक्ष्मण तापेल्ली व 32 वर्षे रा. वार्ड नं.06 घुग्घूस यास ताब्यात घेवून त्याचे कडून 174 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. त्याचे विरूद्ध पो.स्टे.घुग्घूस येथे अप.क्र. 12 / 2023 कलम 8 (क) 20 (ब) (ii) (ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S.अॅक्ट) 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोहवा संजय आतकुलवार .2215, पो. हवा प्रमोद डंबारे .779, ना.पो.कॉ. संतोष येलपूलवार.2535, पो.कॉ. नितीन रायपुरे . 2549, गोपाल आतकुलवार .2579, रविंद्र पंधरे .1558, कुंदनसिंग बावरी/2949, नरेश डाहुले . 761, म.पो.कॉ. निराशा तितरे 1522 यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. घुग्घूस हे करीत आहे..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment