राजुरा 24 फेब्रुवारी :बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातीचे किल्ले बनविणे हा उपक्रम व स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने व स्वयं स्फुर्ततेने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भास्करराव येसेकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे त्याचबरोबर शाळेतील इतर शिक्षक वृंद उपस्थित होते .
Clay fort making competition held in Adarsh School on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary.
स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून जयश्री धोटे व प्रियंका गौरकार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दलव गड किल्ल्यांबद्दल माहिती व्हावी हा या उपक्रमाचा हेतू होता. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
0 comments:
Post a Comment