भद्रावती तालुका प्रतिनिधी: संगणक व मोबाईल मुळे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.आपल्या पारंपरिक खेळामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहू शकते .मात्र हे खेळ आता जास्त प्रमाणात कुणी खेळत नसल्याने ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहे .या खेळाविषयी विध्यार्थी व युवकांमध्ये गोडी निर्माण करून मैदानी खेळ वाचविणे काळजी गरज असल्याचे मत विठ्ठल रामकृष्ण हनवते यांनी व्यक्त केले.Saving field games requires care- Vitthal Ramakrishna Hanavate (Mr. Deputy Sarpanch and Social Reformer)
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे जय बजरंगली क्रिडा मंडळ चंदनखेडा यांनी पुरुषांचे भव्य कबड्डी सामने ( वजन गट- ६०) दिनांक २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ तिन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन नरवीर तानाजी पटांगण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात होत आहे तरी . प्रथम पुरस्कार २१००० मा.श्री . हंसराजजी अहीर अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री (भारत सरकार) यांच्याकडून, दुतिय पुरस्कार १५००० प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा यांचे कडून, तृतीय पुरस्कार १०००० शाहरुख पठाण, सुधीर दोहतरे, जगदीश बोढे, प्रमोद ठावरी,राजु मस्के यांचे कडून,चतृर्थ पुरस्कार ७००० जय बजरंबली क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या कडून आहे, वैयक्तिक बक्षिसे रिंगणे सर, सतिश उरकांडे यांच्याकडुन, आकर्षक बक्षिसे मारोती गायकवाड मा.जिल्हा परिषद सदस्य व डेविड बागेसर मा.उपसरपंच यांचे कडून, व खेडाळूची भोजन व्यवस्था विठ्ठलजी रा.हनवते मा.उपसरपंच तथा समाजपरिवर्तक यांचे कडुन करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले रिंगणे सर मुख्याध्यापक शासकिय आश्रमशाळा चंदनखेडा हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक मारोती गायकवाड मा.जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलजी हनवते मा.उपसरपंच तथा समाजपरिवर्तक, डेविड बागेसर माजी उपसरपंच, मनोहर हनवते अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती, देविदास ससाने, स्वेता भोयर ग्रामपंचायत सदस्या,बलकी सर, शाहरुख पठाण,सिंगलदिप पेंन्दाम, आनंदराव मुडेवार,क्रिडा मंडळाचे अध्यक्ष पवन भोस्कर आदि मान्यवर उद्घाटनप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटनीय चार संघ घेडविले व उद्घाटनिय अंतिम विजेता संघास जय बजरंबली क्रिडा मंडळाकडुन ३००० रुपये रोख बक्षीस उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विजय संघास देण्यात आले. यावेळी गावकरी,महिला वर्ग,बोलगोपाल, खेळाडू भरपूर प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष सुरेश हनवते यांनी केले.
0 comments:
Post a Comment