भद्रावती- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील ६३ वजन गटात वैशाली रामेश्वर दाते एम. एस्सी. (भाग-१) व भाग्यश्री विनायक खिराळे बि.एस्सी. (भाग-२) या खेळाडूंची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आंतर महाविद्यालय पॉवरलिफ्टिंग (मुली) स्पर्धेत निवड झालेली असून ९ ते १२ मार्च २०२३ दरम्यान होणार्या हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालय, येथे होणार्या भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच या खेळाडूंना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली कडून कलर कोट देऊन सन्मान सुद्धा देण्यात आला. Selection of Powerlifting (Girls) Athletes from Nilakanthrao Shinde College of Science and Arts, Bhadravati in Indian Inter University Competition
भद्रावती तालुका मधून प्रथमच या खेळात मुलींची निवड झाल्याबद्दल भद्रावती वासीय कौतुक करीत आहेत.
या यशाचे श्रेय खेळाडूंनी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विशाल शिंदे व श्री. अजिज शेख, यांना दिले.
या खेळाडूंना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, डॉ. जयंत वानखेडे, प्रा. रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. किशोर ढोक, डॉ. गजेंद्र बेंदरे, डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. अपर्णा धोटे, डॉ. दहेगावकर, डॉ. वाढवे, डॉ. शशिकांत शित्रे, डॉ. नासरे, प्रा. प्रधान, श्री. अजय आसुटकर, श्री.विशाल गौरकार, श्री.किशोर जथाडे, श्री. शरद भावरकर, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. खुशाल मानकर, श्री. प्रमोद तेलंग, श्री. बंडू पेंदोर हे सत्कार कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते याप्रसंगी खेळाडूंना गौरविण्यात आले व पुढील होणार्या भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता सुभेच्छा देण्यात आल्यात.
0 comments:
Post a Comment