भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
वेळोवेळी निवेदने देऊनही सात अनुकंपाधारकांना कर्नाटका एम्टा कंपणीत प्रशासनाने नोकरीत सामाऊन न घेतल्याने या सातही अनुकंपाधारकांनी दिनांक 25रोज शनिवारला पहाटेच्या वेळेस बरांज येथील खाण परिसरात शिरुन जल आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र याची माहिती खाण प्रशासनाने पोलीसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले व अनुकंपाधारक व खाण प्रशासनाच्या बैठकीचे आयोजन करुन त्यात यावर परस्पर तोडगा काढण्यास सांगितले.या सात अनुकंपाधारकांपैकी जवळपास अंशी टक्के उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातील असुन हा ओबीसी ऊमेदवारांवरील अन्याय असल्याचा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे.Water movement in seven compassions of Karnataka EmTa mine.
दरम्यान या आंदोलकांची घटनास्थळी जाऊन भाजपचे शहर महामंत्री तथा नगरसेवक प्रशांत डाखरे यांनी भेट घेऊन माहिती जाणुन घेतली व या आंदोलनाची माहिती ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना आंदोलनाची माहिती दिली.या सातही अनुकंपाधारकांचे वारसान पुर्वी या खाणीत कार्यरत होते.मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याने या अनुकंपाधारकांनी नोकरीत सामाऊन घेण्याची मागणी वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून खाण प्रशासनाकडे केली.यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा तहसिलदारांनाही निवेदने देण्यात आली.यावर अधिकाऱ्यांकडून या अनुकंपाधारकांना नोकरीत सामाऊन घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्याचे समजते.मात्र याकडे खाण प्रशासनाने दुर्लक्ष करुन अनुकंपाधारकांना आजपर्यंत कामावर घेतले नाही.त्यामुळे या अनुकंपाधारकांनी आंदोलनाचे पाऊल उचलले.आम्हा सर्वांना त्वरीत नोकरीत सामाऊन घ्यावे अशी मागणी यावेळी मंगेश निखाडे व शालू निखाडे यांच्यासह सात अनुकंपाधारकांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment