Ads

निवासी घराच्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या

मुल:- मुल शहर निवासी मागील तीस वर्षापासुन मुल शहरात वास्तव्यास असुन आम्हाला स्वताचे निवासाकरीता जागा नाहि तेव्हा आम्ही आपआपल्या परीने जागा संपादित करून मागील तीस वर्षापासून वास्तव्य करीत आहोत परंतु आम्हाला स्वतःच्या निवासासाठी हक्काची जागा नाही तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून आम्हाला मालकि हक्काचे निवासी पट्टे देण्यात यावे या आशयाचे निवेदन मनसेचे चंद्रपूर जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा)श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तहसीलदार साहेब मुल तसेच मुख्याधिकारी साहेब नगरपरीषद मुल यांना देण्यात आले.
Permanent lease of residential house premises
तसेच निवेदन या आधी दिनांक ३१/०१/२०२२ ला या संबधीत निवेदन तहसील कार्यालयाला दिले होते मात्र आज एक वर्ष लोटूनहि आपल्या स्तरावर कोणतीहि दखल घेतली गेली नाहि मात्र सदर निवेदनाची १५ दिवसाचे आत दखल न घेतल्यास आणि येथील नागरीकांना न्याय न मिळाल्यास मनसे शैलीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला निवेदन देतांना मुल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे, प्रविण गूरूनूले, प्रविण भरतकर, महेश वैरागडवार, विनोद पेंदोर, अक्षय वाकडे, तसेच मुलचे पदाधिकारी व मनसेसैनिक उपस्थीत होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment