Ads

नगरपंचायत सिंदेवाही तील त्या अर्धवट नालीच्या खोदकाम मुळे अपघाताची शक्यता

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही -Nagar Panchayat Sindewahi नगरपंचायत सिंदेवाही- लोनवाही शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये नालीचे बांधकाम सुरू आहे. काही कारणास्तव त्या नालीचे बांधकाम खड्डा खोदून अर्धवट सोडल्याने या खड्ड्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.There is a possibility of accident due to the digging of that partial drain in Nagar Panchayat Sindewahi
नाली पूर्ण करण्यासंदर्भात प्रभागातील नागरिकांनी नगर पंचायतचे मुख्य अधिकारी यांना पंधरा दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. पण नगर पंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रभागातील नागरिकांनी केला आहे. शहरात विविध प्रभागांतील रोड व नाल्याचे बांधकाम होत आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत नालीचे बांधकाम संथ गतीने सुरू असल्याचे दिसते. नालीचे खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी त्वरित कामे करावी, तसेच कामे करताना प्रभागातील नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी नगर पंचायतीकडे केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment