चंद्रपुर :दिनांक १ मार्च, २०२३ रोजी महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या नेतृत्तवातील पथकाने मोटार सायकल चोरीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार शोध मोहिम व पेट्रोलींग राबवीत असतांना उडीया मोहल्ला जलनगर वार्ड चंद्रपूर येथे सापळा रचुन रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सचिन ताराचंद घरत वय ३५ वर्ष रा. इंदिरानगर वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचे कडील कागदपत्रे नसलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम.एच. ३४ बी वाय १४३३ ही गाडी ताब्यात घेवुन त्याचे कडे बारकाईने विचारपुस केली असता त्याने सदर गाडी व्यतिरिक्त आणखी दोन मोपेड गाडया चोरल्याचे सांगितल्याने त्याचे कडुन नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा ५ जी आणि लाल रंगाची एविएटर गाडी हस्तगत केले. सदरची वाहने इंदिरानगर वार्ड, केमीकल वार्ड तसेच साई पॉलीटेक्नीक कॉलेजचे मागील परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
एकंदरीत सदर आरोपी कडुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने एक काळया रंगाची हिरो स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल क्रमांक एम.एच. ३४ बी वाय १४३३ किंमत अंदाजे ७०,०००/- रु. (२) एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा ५ जी मोपेड नंबर प्लेट नसलेली किं. ६०,०००/- रु. आणि (३) एक लाल रंगाची एविएटर मोपेड नंबर प्लेट नसलेली किं. ७०,०००/- रु. असा एकुण १,९०,०००/- रुपयाची मुद्देमाल
हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूरयांचे मार्गदर्शनाखाली श्री महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पथकातील पोहवा / २२१५ संजय अतकुलवार, पोशि/ २५४९ नितीन रायपुरे, पोशि/ २९४८ प्रांजल क्लिप, पोशि/ १५५८ रविंद्र पंधरे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment