Ads

गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

चंद्रपुर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गॅस दर वाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जनता महाविद्यालय चौकात आंदोलन करण्यात आले आंदोलन कर्त्यानी "बहोत हो गई महगाई की मार ,बस करो मोदी सरकार "गॅस दर वाढ कमी करा" "महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालणे मे हो गये फेल"अशा जोरदार घोषणा केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.Against gas price hike
In opposition to the Central Govt .Movement of Nationalist Mahila Congress
जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होत आहे. महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना 1103 रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजाराच्या वर आकडा पार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी जुलै, मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे.वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत आहे.अशी जोरदार टीका केद्र सरकारवर केली. गॅस दरवाढ मागे घ्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उईकेंनी दिला.यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हाउपाध्यक्ष वंदना आवळे जिल्हाप्रसिध्दी प्रमुख पुजा सेरकी जिल्हासंघटक सचिव सरस्वती गावंडे चंद्रपूर तालुका अध्यक्ष वनिता मावलीकर विधानसभा अध्यक्ष किरणं साळवी तालुका सुशीला टेलमोरे शहराध्यक्ष सुनीता अर्चना चावरे नीता गेडाम सुशीला डखरे जिल्हा सचिव नंदा सेरकी जिल्हासहसचिव शोभा घरडे जिल्हा संघटकसचिव प्रमीला पाठक कलाताई , सुरेखाताई महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment