Ads

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीला मंत्र्यांची हिरवी झेंडी

चंद्रपूर : विधानसभेत सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पावर बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. यावेळी त्यांनी हि रिक्त पदे तात्कळ भरण्याची देखील मागणी केली होती. या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हि पदे तात्कळ भरणार असल्याचे सांगितले. Ministers give green signal to MLA Pratibhatai Dhanorkar's demand
उच्च व तंत्र शिक्षण विभाग रोजगार देणारे शिक्षण देतात. परांतू या विभागामध्ये शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. त्यामुळे या विभागातील महाविद्यालयात सर्व पदे तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती.

यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्राचार्य संवर्गातील १०० टक्के रिक्त होणारी पदे, २०८८ सहाय्यक प्राध्यापक, १२१ ग्रंथपाल व १०२ शारीरिक शिक्षण संचालकांच्या पदाच्या समावेश आहे. हि पदे तात्काळ भरल्यास हजारो विद्यार्थ्याना दर्जात्मक शिक्षण मिळणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागात कार्यरत शिक्षक व विद्यार्थ्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment