भद्रावती:तालुका प्रतिनिधी जावेद शेख - गेल्या अनेक वर्षापासून शहरातील ऑटो चालकांना हक्काचे ऑटोस्टॅंड मिळावे अशी मागणी होती शेवटी नगरपालिकेने पुढाकार घेत बस स्थानक परिसरात एक सुंदर ऑटो स्टॅन्ड तयार केले हे हक्काचे ऑटो स्टॅन्ड ऑटो चालकांना मिळाले याचे समाधान आहे या ऑटो स्टॅन्ड मुळे चालकांना व प्रवाशांना सुविधा मिळणार असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
भद्रावती येथील नगरपरिषद फंडातून तयार करण्यात आलेल्या ऑटो स्टॅन्डचा लोकार्पण सोहळा आज दिनांक 22 ला खासदार बाळू धानोरकर यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, ठाणेदार बिपिन इंगळे, मुख्याधिकारी विशाखा शेळखी, राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रक सुतवणे मॅडम, संतोष आमने आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, ऑटो चालकांचे ऑटो स्टॅन्ड चे स्वप्न पूर्ण झाले यापुढे त्यांना काही समस्या आल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी आपल्या भाषणातून बस स्थानक व परिसरात न. प तर्फे अनेक ठिकाणी सौदर्यकरण करण्यात येईल असा मानस व्यक्त केला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी व वाहतूक नियंत्रक सुचवणे मॅडम यांनी सुद्धा ऑटो चालकांना मुलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शेंडे यांनी तर उपस्थितांचे आभार बाळू उपलचीवार यांनी मानले.
लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी ते करिता सनमोहन केशवन, यशस्वी सहारे, प्रकाश मेंढे ,राजू बालप्पा, अनिल पाटील तथा भद्रावती ऑटो संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment