भद्रावती तालुका प्रतिनिधी :- Crime News चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात मांगली या गावात असलेले जगन्नाथ बाबा मठ येथील 2 जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.Mangli village shaken by double murder
सदर घटना ही 22 मार्च च्या रात्रीची असल्याचा अंदाज आहे,भद्रावती तालुक्यातील नवरगाव रिट मांगली येथे बाबुराव खारकर यांच्या शेतात जग्गनथ बाबा यांचा मठ आहे व बाजूला मधुकर खुजे यांचे शेत आहे हे दोघेही या मठात रात्री झोपले असतांना जगन्नाथ बाबा मठ येथे अज्ञात दरोडेखोरांनी दानपेटी चोरण्यासाठी प्रवेश केला असता तिथे असलेले 70 वर्षीय बापूजी खारकर व 75 वर्षीय मधुकर खुजे यांनी त्या दरोडेखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करीत त्यांच्यावर सब्बलने वार करीत हत्या केली. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हत्येनंतर दरोडेखोरांनी दोन्ही वृद्धांना खाटेवर टाकत दानपेटी घेऊन पसार झाले.
या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मांगली गाव हादरुन गेले असून त्याठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि चंद्रपूर पोलिसांचा ताफा मांगली गावात दाखल झाला आहे. Robbery
भद्रावती तालुक्यातील मांगली या लहान गावी दानपेटी चोरण्यासाठी दोघांची हत्या केल्याची बाब अनेकांना न पचणारी आहे.
0 comments:
Post a Comment