Ads

भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्यांचा मृत्यू

वरोरा( प्रती):- वरोरा -वणी मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात रस्त्याच्या वळणावर हायवा ट्रकने कारला समोरून धडक दिली असता फरफटत नेले या भीषण अपघातात कारमधील डॉक्टर दांपत्य मृत्यू पावले सदर घटना २२ मार्च च्या दुपाच्या सुमारास ३:३० ते ४:०० वाजताच्या दरम्यान घडली.A doctor couple died in a terrible accident
या अपघातात स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अश्विनी अतुल गौरकार (झाडे) (३१) वर्ष ह्या जागीच ठार झाल्या तर डॉक्टर अतुल जनार्दन गौरकार (३५) वर्ष हे गंभीर जखमी झाले होते त्यांना चंद्रपूर येथे हलविले असता कोंढा फाट्याजवळ त्यांनी आपले प्राण सोडले. डॉक्टर अश्विनी गौरकार हया चार दिवसापूर्वीच वणी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुजू झाल्या होत्या तर डॉक्टर अतुल गौरकार हे आर्वी येथील रुग्णालयात कार्यरत होते.
सदर डॉक्टर दांपत्य एमएच ३४ एएम _४२४० या आपल्या वरना कारने वणीकडे जात होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक एम एच ३४ बी झेड२९९६ हा हायवा ट्रक भरधाव येत होता शेंबळच्या शिवारातील रस्त्याच्या वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर भिडली असता भीषण अपघात झाला
हा अपघात इतका भीषण होता की डॉक्टर दांपत्याची कार पुढील बाजूने चकनाचुर झाली व एक किलोमीटर अंतरावर ट्रकने कारला फरफटत नेले या प्रकरणी हायवा ट्रकचा ड्रायव्हर अभिमन्यू सांकेत वय २८ वर्ष याला पोलिसांनी अटक केली
डॉक्टर दांपत्यांना दीड वर्षाचा शेरवीर मुलगा आहे या दुर्दैवी घटनेमुळे वणी, वरोरा , मारेगाव तसेच वर्धा जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment