Ads

अशी ही आरोग्यवर्धक गुढी......

राजुरा 22 मार्च :नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष राजश्री समीर उपगन्लावार यांनी विविध भाजीपाल्याचा वापर करून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी आरोग्यवर्धक आरोग्याची गुढी असा संदेश दिला.Such a healthy Gudi...
या छोटयाश्या गुढी मध्ये
पालक, कांदा, लसूण, गोडनिंबाचे पान, लाल मिरची, चवळीच्या शेंगा, शेवग्याची शेंग अशा विविध प्रकारच्या भाजीपाल्याचा वापर करून ही गुढी तयार केली आहे. नेफडो चे राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाचे व्यासपीठ हे सुप्त गुणांना व्यक्त होण्याचे एक महत्वपूर्ण दालन ठरत आहे. गायन, वादन, चित्रकला, नाटक, पेंटिंग, भाषण -संभाषण, व्यक्तिमत्व विकास, कविता लेखन, सूत्रसंचालन, सभाधीटपणा, वकृत्व, विविध स्पर्धामध्ये सहभागी होणे, स्वतः मधील सुप्तगुण शोधून त्यांचा विकास साधने आदी विषयी राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या माध्यमातून कार्य करीत आहे. नागपूर विभाग अध्यक्षा म्हणून राजुरा येथील गाणकोकिळा अशी ख्याती असलेल्या अल्का दिलीप सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती संपूर्ण नागपूर विभागात कार्यरत आहे. राजश्री यांनी यापूर्वी ही अनेक लक्षवेधी रांगोळ्या, चित्र, पेंटिंग, वृक्ष सजावट, बोन्साय ट्री निर्मिती, फळ, फूल, पान यांच्या साह्याने विविध कलाकृती तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या नेहमीच दिनविशेष लक्षात ठेवून त्या दिवसांचे महत्व आपल्या कलेच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देऊन साजरे करीत असतात. त्यांनी राबाविलेल्या या उपक्रमाना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दिपक भवर, सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्ष प्रकाश कदम, महिला अध्यक्ष डॉ. प्रीती तोटावार, उपाध्यक्ष तेजस्विनी नागोसे, नागपूर विभाग अध्यक्ष विजय जांभुळकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा रजनी शर्मा, संतोष देरकर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment