ऊर्जानगर (चंद्रपूर):-मानवी जीवनाची नाळ हि पर्यावरणाशी जुळलेली असल्यामुळे पर्यावरण रक्षणातच मानवी जीवनाचे रक्षण आहे व पर्यावरणातील ज्या संसाधनांची कमतरता आहे त्याचा नाश न करता ज्या समाजविघातक कुप्रवृती वाढलेल्या आहेत त्याचे प्रतिकात्मक दहन करून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि युवा सोशल फाउंडेशन ,सोशल युवा ग्रुप ऊर्जानगरच्या वतीने सार्वजनिक पर्यावरणपूरक होळीचे चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील खुले रंगमंच मैदान येथे आयोजन करण्यात आले.Eco-friendly public Holi celebrated with enthusiasm at Urjanagar
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्याम राठोड उपमुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र तर प्रमुख अतिथी प्रभारी उपमुख्य अभियंता मा.सुहास जाधव ,मा.अनिल पुनसे,अधिक्षक अभियंता दिनेश चौधरी ,मा.पी.एम.जाधव चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष महा अंनिस ,मा.प्रशांत दुर्गे अध्यक्ष श्रीगुरूदेव सेवा मंडळ ,मा.मंजुषा शेषराव येरगुडे सरपंच ऊर्जानगर, राठोड मॅडम, मा.मुरलीधर राठोड अध्यक्ष अंनिस ऊर्जानगर शाखा यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
या परिसरातील पाला पाचोळा जमा करून तयार केलेली पर्यावरणपूरक होळी श्याम राठोड उपमुख्य अभियंता याचे हस्ते पेटविण्यात आली.सोबतच प्रमुख अतिथीच्या हस्ते समाजातील हिंसाचार,बलात्कार,अंधश्रद्धा,भ्रष्टाचार, आतंकवाद, स्त्रीभुणहत्या,व्यसनाधीनता,हुंडाबळी या कुप्रवृतीचे होळीत दहन करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांचे शुभेच्छापर मार्गदर्शन घेण्यात आले.याप्रसंगी वसाहतीतील कविवर्य मा किशोर मुगल,सुरेंद्र इंगळे,मधुकर दुफारे यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.यावेळी पर्यावरण पूरक होळीनिमित्त पर्यावरण या विषयावर घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धा व काळानुरूप पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचे फायदे या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे.तसेच पर्यावरण पूरक जुन्या साडी पासून कापडी पिशवी तयार करून त्याचा वापर करावा व प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन मा.दिनेश चौधरी यांनी केले.
"होळी करा लहान,पोळी करा दान" या संकल्पनेतून होळी दहणानंतर जमा झालेल्या पुरण पोळ्या व ईतर साहित्य एकत्र करून त्या वांढरी येथील मुलाच्या अनाथालयात आणि डेबू सावली वृद्धाश्रमात पोहचविण्यात आल्या याकरिता युवा कार्यकर्ते किसन अरदडे ,वंश निकोसे,हर्षल मेश्राम व टीमचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंनिसचे उपाध्यक्ष दुरेंद्र गेडाम यांनी केले तर आभार संजय जूनारे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता नारायण चव्हाण जिल्हा प्रधान सचिव, देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष, सचिव बाळकृष्ण सोमलकर, शंकर दरेकर,भैयाजी उईके,विजय राठोड ,राजा वेमुला,लीना चिमुरकर,मालू कोंडेकर,कविता राजूरकर व इतर महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि युवा सोशल फाउंडेशन,युवा सोशल ग्रुप यांचे उत्तम सहकार्य लाभले आणि ऊर्जानगर वासीयांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
0 comments:
Post a Comment