Ads

- राज्यातील कर्मचारी संघटनेच्या राजुरा येथील रॅलीत सहभागी आंदोलनकर्त्यांना पाणी बॉटल वाटून वाढदिवस केला साजरा.

राजुरा :अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आज राजुरा तालुक्यातील विविध कार्यक्षेत्रातील अनेक कर्मचारी यांनी पंचायत समिती राजुरा ते तहसील कार्यालय पर्यंत काढलेल्या रॅलीतील सहभागी आंदोलकर्त्यांना पाणी बॉटल वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.- Celebrated the birthday by distributing water bottles to the agitators participating in the rally at Rajura of the employees' union of the state.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे चंद्रपूर जिल्हा युवा सचिव तथा छावा फाउंडेशन चे उपाध्यक्ष बबलू चव्हाण व नेफडो चे राजुरा शहर सचिव तथा छावा फाउंडेशन चे सचिव आकाश वाटेकर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी आपल्या वाढदिवसा निमित्याने राजुरा येथे पंचायत समिती चौक येथून निघालेल्या अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी निघालेल्या राजुरा तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तालुका राजुरा व जुनी पेन्शन हक्क समन्वय समिती मार्फत निघालेल्या रॅलीतील सहभागी आंदोलनकर्त्या कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वितरित केल्या. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणी छावा फाउंडेशन राजुरा या संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत असून आपल्या अनोख्या उपक्रम, कार्यक्रम, समाजसेवेकरिता या संस्था ओळखल्या जात आहेत. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नेफडो, आशिष करमरकर, अध्यक्ष, छावा फाउंडेशन तथा चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष नेफडो, रुपेश चीडे, चंद्रपूर जिल्हा सचिव, नेफडो, मनोज तेलीवार, राजुरा तालुका अध्यक्ष, नेफडो, तसेच छावा फाउंडेशन व नेफडो चे संदीप पोगला, अमोल राऊत, गौरव रागीट, प्रज्वल कुईटे, गणेश रागीट, पवन टेकाम, पियुष टेकाम, अंकित रागीट, सुमित इटनकर, राहुल अंबादे, रकिब शेख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment