पोंभूर्णा :- तालुक्यातील बोर्डा दिक्षीत येथील वृद्धाचा गोवाळीतील चारा बैल खात असल्याने त्याचा बंदोबस्त करण्याच्या किरकोळ वादावरून व पुर्ववैमनस्यातून खून झाला.सदर भांडण हे ४ एप्रिलला रात्रो ८ वाजताच्या सुमारास घडली. किसान लिंगाजी कुमरे वय ७५ वर्ष असे मृतक वृद्धाचे नाव आहे.Murder of 75-year-old man in Borda Dixit
Case registered against six accused
मात्र मृतकाच्या घरच्यांनी सदर मृतदेह हा आरोपीच्या घरी नेऊन ठेवला असल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी पोलिसांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस,आर.सी.बी.ची टिम व दंगा नियंत्रण पथक तैनात केले होते. गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. मात्र वृद्धाच्या खुन प्रकरणी गावात बराच वेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.समाजबांधव व कुटुंबानी मृतकाचे संबंधाने मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतला होता.पोलिसांनी या गुन्ह्यात केशव गेलकीवार वय 55 वर्षे,दामोदर गेलकीवार 40 वर्ष,अक्षय गेल्कीवार वय 30 वर्षे,शुभम गेलकीवार वय 23 वर्षे, तुळशिदास गेल्कीवार वय 20 वर्षे सर्व बोर्डा दीक्षित येथील आहेत. यात कल्पना केशव गेलकीवार यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment