Ads

आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे शेतकरी उत्थान धरने आंदोलन

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख:दिनांक 2 मे रोजी आम आदमी पार्टी तालुका व शहर कार्यकारणी तर्फे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक कर्जामध्ये सिबिल स्कोर ची अटी शर्ती महाराष्ट्र सरकारने लागू केल्या. त्या अटी शर्ती तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोबदला देण्यात यावा तसेच शेतीला दिवसा सलग 10-12 तास वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीचे निवेदनभद्रावती तहसीलदारांमार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले. Farmers Utthan Dharne Movement by Aam Aadmi Party Bhadravati
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कोरडवाहू शेती ,ओलीत शेती ,फळाची शेती, अशा अनेक पद्धतीने विभागणी करून कर्ज मर्यादा शासन ठरवत आहे. एकीकडे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मोठमोठे उद्योगपतांचे कर्ज माफ करत आहे , महसूल वसुली वर सूट देत आहे आणि एकीकडे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून मोठे मोठे जाहिराती टीव्हीवर पेपरांमध्ये येणारे हे सरकार शेतकऱ्यांवर अटी शर्ती लागू करून शेतकऱ्यांचा उत्साह कमी करू इच्छित आहे याचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे. हा देश पूर्वीपासून कृषीप्रधान देश आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे एकही निर्णय घेतलेले दिसत नाही. त्यामध्ये शेतीला वीजपुरवठा सुद्धा तुटक पद्धतीने दिला जातो. यावरून सरकारचा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ न करता दुर्बल करण्याचे धोरण दिसत आहे. परंतु आम आदमी पार्टी सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहील. शेतकऱ्यांवर होणारा कोणताही अन्याय कोणत्याही बदल्यात सहन करणार नाही. आज आम आदमी पार्टीने राज्यव्यापी शेतकऱ्यांच्या समर्थनात जे निवेदन दिले ते एक सरकारला चेतावणी आहे. यानंतर आम आदमी पार्टी शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. सदर निवेदन आम आदमी पार्टी जिल्हा संघटन भिवराजजी सोनी यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख यांच्या प्रमुख उपस्थिती मधे व आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष सोनाल पाटील व शहर अध्यक्ष सुरजभाऊ शहा यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देन्यात आले त्यावेळी उपस्तीत पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय भाऊ सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment