गडचांदूरात बसस्थानक निर्मितीसाठी "भीक मांगो आंदोलन"
(वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांचे नेतृत्व.)
गडचांदूर:-
गडचांदूर शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुसज्ज असा बसस्थानक नाही.अनेकदा मागणी करण्यात आली,मात्र यासंदर्भात काहीही सकारात्मक बदल दिसून आले नाही.जिल्ह्यात इतर ठिकाणी सुसज्ज असे बसस्थानक बनवण्यात आले मात्र या शहरात बसस्थानक व्हावे यासाठी आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी निर्णायक पुढाकार घेतला नसल्याचे आरोप होत आहे.बसस्थानकसाठी शासनाकडे निधी नसल्याचे बोलले जात असून याच पार्श्वभूमीवर याठिकाणी लवकरात लवकर बसस्थानकाची निर्मिती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात 2 मे रोजी "भीक मांगो आंदोलन" करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या या शहरात सर्वसुविधा युक्त,सुसज्ज असा बसस्थानक नसल्याने येथे येणार्या जाणाऱ्या महिला,पुरूष,शाळकरी मुली आणि विशेषतः वृद्धांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.निवांतपणे बसण्याची जागा नसल्याने महिला,मुलींना तसेच इतर प्रवाशांना लगतच्या प्रसाधनगृहच्या समोर बसून बसची वाट पहावी लागत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.मेन रोड असल्याने अपघाताची शक्यता बळावली असून इतक्या मोठ्या शहरात बसस्थानक नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या नावाखाली याठिकाणी माणिकगड सिमेंट कंपनीच्या माध्यमातून केवळ प्रवासी निवारे उभारून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे.मात्र आसन पट्टी तुटल्याने सध्याच्या परिस्थितीत तेही कुचकामी ठरत आहे.चारही ऋतूत प्रवाशांचे अक्षरशः हाल होत असून बसस्थानक नसल्याने लोकांना मोठा शारिरीक,मानसीक त्रास होत आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात बसस्थानकासाठी करण्यात आलेल्या भव्य "भीक मांगो" आंदोलनात कविताताई गौरकार महिला जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी,रामदास चौधरी जेष्ठ नेत्या अलकाताई मोटघरे जिल्हा महासचिव,अमोल निरंजने तालुका संघटक,बालाजी सोनकांबळे तालुकाध्यक्ष जिवती,ललिताताई गेडाम जेष्ठ सल्लागार,धीरज तेलंग जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन,मायाताई दुर्गे बेबीताई वाघमारे,आशाताई सोंडवले,सरोजताई दुबे,वैशालीताई दूधगवळी,जयाताई खैरे,सुजाता वाघमारे,रत्नमालाताई वाघमारे,जेष्ठ सल्लागार दिव्य कुमार बोरकर,सुरज उपरे यांच्यासह वंचित बहूजन महिला आघाडी,युवा आघाडी,सम्यक विद्यार्थी आघाडी व स्थानिक जनता या आंदोलनात सहभागी झाले होते.भीक मांगून जमा झालेली निधी बसस्थानकाच्या उभारण्यासाठी शासनाला पाठवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.आता तरी शासन,प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------//--------
0 comments:
Post a Comment