Ads

यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर : यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. विशेष म्हणजे यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी महिलांसाठी उत्तम काम करत असुन विविध आयोजनांच्या माध्यमातुन महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम त्यांच्या वतीने केल्या जात आहे. एंकदर यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.Young Chanda Brigade's Women's Front Striving for Women's Empowerment-MLa. Kishore Jorgewar
बाबुपेठ येथील शेकडो महिलांनी यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला आहे. बाबुपेठ येथील हुसेन मंजील येथे या भव्य प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेडच्या नवनियुक्त सदस्यांना संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, , मारोती करंबे, हुसेन सैयद जाहीर हुसेन, कमाल कोल्हे, अनुसया करंबे, अब्बास शेख, सायली येरणे, आशा देशमूख, कविता निखारे, नीलिमा वणकर, मंजू राखडे, अर्चना डांगरे, आयशा पठाण, गुलनाज, जायदा पठाण, पुष्पा प्रसाद, दीपिका मुजोके, शमशाद पठाण, वंदना कडूकर, सविता चोखारे, ज्योती नंदुरकर, अर्चना सावरकर, मनीष पेटकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातुन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केल्या जात आहे. महिलांसाठी उल्लेखनीय काम संघटना करत आहे. चला आठविणींच्या गावात या उपक्रमा अंतर्गत आपण विशेष महिलांसाठी 21 प्रकारच्या पांरपारिक खेळांचे आयोजन केले होते. यात जवळपास पाच हजार महिलांनी सहभाग घेतला. पारिवारीक व्यस्थतेत असलेल्या महिलांनी काही वेळ स्वतासाठी जगावे हा या आयोजना मागचा उद्देश होता. घरची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असतांना महिलांचे स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपण महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आपण महाकाली महोत्सवाचे आयोजन केले होते. या आयोजनात नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचा शिक्का दीला. तर 999 कन्यांना भोजनदान देण्यात आले. महिला शक्तीचा जागर व्हावा हा या मागचा उदिष्ट होता. महिलांना न्याय देण्यासाठी ही संघटना काम करत आहे. महिलांना स्वयंरोजगारातुन आर्थिक प्रगती साधता यावी या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांना शिवनकाम प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. या अंतर्गत जवळपास आपण 500 महिलांना हे प्रशिक्षण दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कर्तव्य सेतु केंद्राच्या माध्यमातुन आपण महिलांना निशुल्क निराधार कार्ड काढून देण्याचे काम करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आज या संघटनेत प्रेवश घेणा-या महिलांनी आता समाजातील दु:ख, समस्या आमच्या पर्यंत पोहोचव्यावात, शेवटच्या गरजु पर्यंत पोहचुन त्यांना मदत करण्याचे काम आपल्या वतीने व्हावे अशी अपेक्षा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली .
या प्रसंगी कामगारांचाही सत्कार करण्यात आला. यात सफाई कामगार बिस्मिल्ला शेख, सविता दुर्गे, ज्योती उंदीरवाडे, आशा कोठेकर, आशा वर्कर वर्षा मोरे, पुष्पा गौरकार यांच्यासह ईतर कामगारांचा समावेश होता. या कार्यक्रमात वंदना हातगावकर यांनी प्रास्ताविक, कल्पणा शिंदे यांनी संचालन तर नंदा पंधरे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment