Ads

इंटकच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपूर :काँग्रेस समर्थित इंटरनॅशनल ट्रेड युनियन इंटकच्या ७७ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून दुर्गापूर येथील शक्तीनगरातील आटोडोरियम येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Organizing various programs on the foundation day of INTUC
National Secretary of INTUC K.K.Singh's initiative
या कार्यक्रमाला वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक एस. वैरागडे, दुर्गापुर खान परिसराचे व्यवस्थापक जे. एकांम्बरम, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामु तिवारी, बल्लारपूर इंटकचे अध्यक्ष आर. शंकरदास, माजरी इंटकचे अध्यक्ष श्री. धनंजय गुंडावार, चंद्रपूर इंटकचे सचिव श्री शंकर खत्री यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. इंटकचे राष्ट्रीय सचिव के. के. सिंग यांनी प्रास्ताविकातुन इंटकच्या स्थापनेचा इतिहास, इंटकचे काँग्रेससोबत असलेले संबंध, इंटकचा मुख्य उद्देश आणि त्यासोबत संलग्नित अन्य संघटना यासोबतच आजपर्यंत झालेले अध्यक्ष आणि महामंत्री यांच्या विषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन पद्मेश यादव यांनी तर आभार अविनाश लांजेवार यांनी मानले.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 77 मान्यवरांनी रक्तदान केले. वेकोली क्षेत्राचे महाप्रबंधक वैरागडे साहेब यांनी रक्तदान करीत शिबिराची सुरुवात केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अपर्णा रामटेके, श्री आशिष जी आणि त्यांच्या चमुने सहकार्य केले. यावेळी श्रीमती सुनिता घोणमाडे आणि श्रीमती देवी रेड्डी यांनीसुद्धा रक्तदान केले. लालपेठ खुल्या कोळसा खाणीचे एच एम एस संघटनेचे सचिव भूषण देवाईकर आणि क्षेत्रीय रुग्णालयाचे एच एम एस चे सचिव प्रतिक रामटेके यांनी इंटकमध्ये प्रवेश केला. यावेळी इंटकचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश महामंत्री विनोद दत्तात्रय यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ज्यूस, नाश्ता याची व्यवस्था वेकोली खान प्रबंधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या आणि कामगारांच्या उपस्थितीत केक कापून इंटकचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment